Tiranga Times Maharastra —
मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात कडक नाकाबंदी आणि सुरक्षा व्यवस्था लागू करण्यात आली होती. याच दरम्यान विलेपार्ले येथील मिलन सबवे परिसरात मध्यरात्री गोंधळाची घटना घडली. निवडणूक आयोगाच्या स्टॅटिक सर्व्हे टीमच्या नोडल अधिकाऱ्यांसोबत गैरवर्तन व मारहाण झाल्याचे समोर आले. व्हिडीओ शूटिंगवरून सुरू झालेला वाद पुढे राड्यात रूपांतरित झाला. सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी पोलिसांनी एका व्यक्तीस ताब्यात घेतले असून प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.
